Ticker

6/recent/ticker-posts

मराठा आरक्षण टिकवण्यास अपयशी "स्थगिती "सरकारच्या विरोधात मावळ भाजपा वतीने जाहीर निषेध

मावळ : भारतीय जनता पक्ष मावळच्या वतीने “सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा मावळ पंचायत समिती येथे माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर निषेध करण्यात आला

सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात संतापाची लाट महाराष्ट्रात उमटली आहे. आंदोलनावेळी मावळ भाजप कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचे पहायला मिळाले.

निष्क्रिय सरकार मराठा समाजाला आरक्षण टिकून ठेवण्यात पुर्णपणेे अपयशी ठरले आहे. लाखो विद्यार्थ्यांना बेरोजगारांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील प्रश्नांचे काहीही देणेघेणे उरलेले नाहीं.अशा महाभकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्ष मावळच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे,युवाध्यक्ष संदीप काकडे,महिलाध्य्क्ष सायली बोत्रे,सभापती निकिता घोटकुले,उपसभापती दत्ता शेवाळे, मा.सभापती गुलाबराव म्हाळस्कर,संघटनमंत्री किरण राक्षे,सरचिटणीस सुनील चव्हाण आदी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या