Ticker

6/recent/ticker-posts

ग्रेट व्याक्तीमत्व - विकास लिंभोरे

मावळ :  कोरोणा विषाणू या महामारी मुळे संपुर्ण जगात थैमान घातले आहे. अशा परिस्थितीमध्ये पोलीस, डॉक्टर, आरोग्य सेवक,आशा सेविका ,गावातील आपात्कालीन ग्रुप तसेच लोकप्रतिनिधी हे "कोरोणा योध्दा" सेवा ,कार्य करत आहे . अशाच एका आपल्या मावळ तालुक्यातील दिव्यांग बांधवासाठी सेवा कार्य करत असलेल्या समाज सेवक विकास लिंभोरे यांच्या बद्दल  माहीती आपण घेणार आहोत .

          विकासभाऊ लिंभोरे यांचा जन्म मावळ तालुक्यातील तळेगाव येथील  वराळे गावातील एका सामान्य कुटुंबात झाला.लहान पणा पासुन सेवा,कार्य करण्याची आवड असल्याने त्यांच्यांतील गुण हेरुन त्यांना भारतीय जनता पार्टी मावळ तालुका  द्विव्यांग आघाडी अध्यक्ष म्हणुन त्यांना संधी मिळाली .
 
          मावळ तालुक्यात दिव्यांग आघाडीचे विकासभाऊच्या रुपाने नविन नेतृत्व उद्यास आले .त्यांनी शिवजयंती निमित्त काही दिव्यांग मुलांना कर्तव्य फांऊडेशन देहु यांच्या कडून व्हिलचेअर मिळवून दिल्या.स्वतंत्रदिनाच्या निमित्ताने भैरवनाथ विद्या मंदिर शाळेमधे स्व खर्चाने  दिव्यांग व गरीब मुलांना शालेय वस्तूंचे वाटप व आरोग्य तपासणीचे कार्य केले.

         भाऊच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक २/३/२०२० रोजी तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी शिबिर आयोजन केले.यात मोफत online अपंग प्रमाणपत्रासाठी UID फाँर्म भरुन त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळुन दिला.

       कोरोणा महामारी आलेल्या संकटात मावळ तालुक्यातील दिव्यांग व विधवा भगीनी यांना अन्य धान्य किट वाटप केले.तसेच रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे होमियोपँथिक आर्सेनिक एलब्म 30 औषधांचे वाटप केले.कोरोना  काळातही त्यांनी आपल्या बांधवांचा हात सोडला नाही.

      मावळ तालुक्यातील विधवा भगीनी,वृध्द माता,पित्यास श्रावण बाळ योजना ,संजय गांधी योजनेतुन १५० गरजुंना पेंशन मिळवून दिली आहे.ते आपला वेळ दिव्यांग बांधवाच्या सेवा कार्यासाठी घालवत असतात.निरनिराळ्या योजना आपल्या बांधवास पोहचवणे या साठी सतत प्रयत्नशील असतात .मावळ तालुक्यातील माझा कोणताही दिव्यांग बांधव हा कोणत्याही शासकीय योजना पासुन वंचीत राहु नये असे त्यांचे ध्येय आहे.
     
        विकास एजुकेशन सोशल फाऊंडेशन माध्यमातून  दिव्यांग बांधवांसाठी विकासभाऊ हे २४ तास सदैव तात्पर असतात कोणीही त्यांना  8080339362 या नंबर वर फोन केल्यास योग्य सल्ला देऊन त्या कामाचा पाठपुरावा करुन पुर्ण करुन देतात अशा कर्तव्य ,दक्ष ,सेवा कार्य करणार्या जनसेवकास सलाम..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या