रेशन दुकानदारांच्या समस्या संदर्भात मावळ तालुका स्वस्त भाव रेशन दुकानदार संघटनेच्या वतीने मा.राज्यमंत्री संजय(बाळा) भेगडे यांना निवेदन देण्यात आले.
रेशन दुकानदाराना विमा कवच मिळावे,पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत वाटप करण्यात आलेल्या धान्याचे कमिशन लवकरात लवकर दुकानदारांना मिळावे अशा अनेक समस्या संदर्भात निवेदन देण्यात आले.
यावेळी मा.मंत्री संजय भेगडे यांनी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष, सदस्य यांची विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी फोनद्वारे चर्चा घडवून आणली. मा.देवेंद्रजी फडणवीस आणि मा.मंत्री संजय(बाळा) भेगडे यांनी रेशन दुकानदारांच्या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
0 टिप्पण्या