Ticker

6/recent/ticker-posts

श्री राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या प्रित्यर्थ तळेगावात राम राज्य ग्रुपच्या वतीने ५१ किलो पेढे वाटप

तळेगाव दाभाडे - पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराचे ऐतिहासिक भूमिपूजन व शिलान्यास अतिशय उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाले असून कोट्यवधी नागरिकांच्या श्रद्धेला यातून बळकटी मिळणार आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या प्रित्यर्थ नागरिकांना  राम राज्य ग्रुप च्या वतीने ५१ किलो पेढे  वाटप करण्यात आले व   मारुती मंदिर येथे प्रभु श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मा.राज्यमंत्री संजय उर्फ बाळाभाऊ भेगडे , पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष श्री गणेश तात्या भेगडे,  मावळ तालुका भाजपा अध्यक्ष श्री रविंद्र आप्पा भेगडे,  नगरसेवक अमोलभाऊ शेटे, शहराध्यक्ष श्री रविंद्र आप्पा माने , सरचिटणीस श्री. विनायक भेगडे,  उपाध्यक्ष विनोद (बंटीदादा) भेगडे  आदि पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन रामराजे ग्रुपचे विनोद  (बंटीदादा) भेगडे, महेश काकडे,संग्राम गायकवाड, विशाल भेगडे, बिपीनभाऊ भेगडे, ऋषिकेश भेगडे पाटील, विनायक भेगडे, विनायक वसंत भेगडे, संदीपभाऊ माने, कपिल देवडीगा, सागर पुरणकर, शैलेश बेल्हेकर, शुभम भेगडे, अक्षय चौधरी, नवनाथ वाजे इ. कार्यकर्त्यांनी केले.
---------------------
---------------------
                 ------- × × × ------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या