कामशेत - कामशेत शहरामधे श्रीराम जन्मभूमीच्या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त विविध ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला. विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्यावतीने बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौकात लाडू वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
ग्रामपंचायत उपसरपंच अभिमन्यु शिंदे यांनी आपल्या ग्रामपंचायत केबिनमध्ये श्रीराम जन्मोत्सव साजरा केला.यामध्ये कारसेवक शंकर नाना शिंदे, राजाराम आप्पा शिंदे यांना लाडू भरवून आनंदोत्सव केला.यावेळी सरपंच सरिता पवार,पोलीस पाटील रोहिदास शिंदे,सुरेश परमार,मा. उपसरपंच गणपत शिंदे,भाजपा कामशेत शहर अध्यक्ष मोहन वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते भरत शिंदे,मि.उपसरपंच नितीन गायखे,काशिनाथ येवले,शंकर काजळे आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या