Ticker

6/recent/ticker-posts

जि.प.सदस्य नितीनभाऊ मराठे यांनी केली राजमाची येथील आदिवासी बंधुभगिणीसोबत अनोखी रक्षाबंधन साजरी......


 लोणावळा - कोरोना महामारीमुळे आणि निसर्ग चक्रीवादळामुळे बेजार झालेल्या आदिवासी बांधवांच्या पाड्यावर जाऊन तेथील माताभगिनींच्या हातून राख्या बांधून तसेच तेथील पुरुष बांधवांच्या हातावर महिला आघाडीच्या सदस्यांनी राख्या बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला.सर्वाना गोड मिठाईचे वाटप करून बहीणभावाच्या नात्यातील गोडवा वाढवण्यात आला.  

अनोखी रक्षाबंधन साजरी करताना नितीनभाऊ यांच्याकडून आपल्या बहिणींना अनोखी ओवाळणी पण देण्यात आली.सर्वं माता-भगिनींना साडीची ओवाळणी तसेच दुर्गम डोंगराळ शहरापासून खूप दूर राहत असल्याने आरोग्याची समस्या निर्माण होते म्हणून सर्वं आदिवासी बांधवांची पाड्यावर आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच ओवाळणी म्हणून सर्वाना प्रथमोपचार पेटी नितीनभाऊ यांनी दिली.

यावेळी जि. प.सदस्य नितीनभाऊ सोबत भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्ष सायलीताई बोत्रे,मा.जि.स.सुमित्राताई जाधव,उपाध्यक्ष सीमा आहेर,पवन मावळ अध्यक्ष आश्विनी साठे,रचना विधाते,सारिका शिंदे,सपना देशमुख, सुरेखा गाडे,स्मिता म्हस्के, कल्याणी राक्षे तसेच महिला आघाडी सदस्या उपस्थित होत्या.
---------------------
---------------------
                 ------- × × × ------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या