पवनानगर - पवना बंदिस्त जलवहिनी विरोधात झालेल्या गोळीबारात शहिद झालेल्या शहिद कै.कांताबाई ठाकर, शहिद कै.शामराव तुपे व शहिद कै. मोरेश्वर साठे यांना दिनांक ९/८/२० रोजी सकाळी ११ :०० शहिद स्मारक येळसे येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.
परंतु देशामध्ये आलेल्या कोरोना विषाणु संकटाचे गांभीर्य लक्ष्यात घेता व जमाव बंदी आदेश लागु असल्याने सर्वांना एकत्र येणे शक्य नाही. दि. ९ ऑगस्ट रोजी श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम मा.राज्यमंत्री श्री.बाऴाभाऊ भेगडे यांच्या व मोजक्याच लोकांच्या उपस्थित करण्याचे ठरविले आहे. तरी आपणा सर्वांना नम्र विनंती करतो की आपण ९ ऑगस्ट रोजी आपल्या शहिद बांधवांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येवुन गर्दी न करता आपल्या घरीच सुरक्षित रहावे व आपल्या घरुन श्रद्धांजली अर्पण करावी. व करोना ही महामारी देशातुन नष्ट होण्यासाठी प्रार्थना करावी. आपल्या व आपल्या कुंटुबाची काळजी घ्यावी. हीच खरी शहिद बांधवाना श्रद्धांजली ठरेल.
शोकाकुल:- भारतीय जनता पार्टी मावळ तालुका, शेतकरी कामगार पक्ष
-----------------------------
0 टिप्पण्या