पिंपरी/मावळ : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने (वय५४) यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज (शनिवारी) सकाळी चिंचवड येथील खासगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे. दत्ता साने हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक होते. चिखली परिसरातून यांनी लॉकडाऊन काळात गरीब गरजु आठ हजार लोकांना अन्न धान्य मदत केली होती त्यामुळे नागरीकांशी जिव्हाळ्याचे संबंध होते .
२५ जून रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर चिंचवड येथील बिर्ला रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचे निधन झाले आहे. त्यांना कोरोनासह निमोनियाची देखील लागण झाली होती. साने यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 टिप्पण्या