कामशेत : कामशेत शहरात कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढत आहे आत्तापर्यत ९ जणांना कोरोना विषाणूची लागन झाली आहे .
कामशेत शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी कामशेत शहर भाजपा अध्यक्ष मोहन वाघमारे यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून पोलिस ,मंडलअधिकारी ,ग्रामपंचायत कर्मचारी यांना मास्क आणि सॅनिटायझर चे वाटप केले.कोरोनाच्या भीषण परिस्थितीमधे काम करत असताना त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली.
या वेळी कामशेत ग्रामपंचायत सरपंच सरिता पवार, उपसरपंच अभिमन्यु शिंदे ,मंडलअधिकारी श्री. खोमने ,ग्रामविकास अधिकारी पी.टी.माने उपस्थित होते. मास्क वाटताना कोरोना बाबत जनजागृती करत घरी राहुया कोरोनाला हरवुया असे आवाहन त्यानी केले.
0 टिप्पण्या