कामशेत - ग्रुप ग्रामपंचायत खडकाळे (कामशेत ) वतीने माऊलीनगर विभागात मेडिक्लोरऔषध वाटण्यात आले आहे.माऊलीनगर प्रभागात पाणी शुध्दीकरण जोडणी नसल्यामुळे पावसाळ्यात साथीचे आजार पसरु नयेत यासाठी उपाय योजना म्हणुन प्रत्येक कुटुंबात मेडिक्लोरचे औषध देण्यात आले आहे.ग्रुप ग्रामपंचायत खडकाळे वतीने माऊलीनगर विभागात पंधरा लक्ष रूपये खर्च करुन पाणी शुध्दीकरण यंत्र लवकरच बसवले जाणार आहे अशी माहिती माऊलीनगर ग्रामस्थांना उपसरपंच अभिमन्यु शिंदे,मा.उपसरपंच गणपत शिंदे यांनी दिली.
या वेळी रामचंद्र बोडके,शंकर बडदे ,सुरेश बालुटकर,अंकुश काटकर,विक्रम शिंदे आदी जण उपस्थित होते.
0 टिप्पण्या