मावळ - महाराष्ट्र राज्यात जवळपास बारा हजार ग्रामपंचायतीची मुदत संपत असून त्यापैकी पुणे जिल्ह्यात जवळपास साडे सतराशे ग्रामपंचायत निवडणुका होणार होत्या परंतु कोरोणा विषाणूच्या पार्श्वभूमी मध्ये सध्या निवडणूका होऊ शकत नसल्याने त्यावर योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून निवड करण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे.अशा पद्धतीचा शासन निर्णय झालेला आहे.
त्याबाबत पुढे असे समजते की ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांनी सदर प्रशासक नेमण्याचे अधिकार त्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यास देण्यात येतील.जर पालकमंत्री यांना अधिकार दिले गेले तर ते त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची वर्णी लावू शकतील त्यामुळे चालू असलेला विकासकामाचा गाडा थांबणार आहे.अपात्र व्यक्ती देखील त्या पदावर येऊ शकतील व मनमानी कारभार होण्याची शक्यता आहे.
सदर निवड ही लोकशाहीला घातक होत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी या निर्णयावर हरकत घेऊन मागणी केली आहे की ज्या ग्रामपंचायतवर विद्यमान सरपंच कार्यरत आहे त्यांना किंवा प्रशासनातील योग्य व्यक्तीला ग्रामपंचायतवर प्रशासक म्हणून निवडण्यात यावे अशा आशयाचे निवेदन पत्र जिल्हाधिकारी कार्यालयात पुणे निवासी उपजिल्हाधिकारी सौ.जयश्री कटारे यांना दिले.
0 टिप्पण्या