वडगाव मावळ - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी आढळलेल्या रुग्ण संख्येवर नियंत्रण म्हणून स्थानिक प्रशासन हे मा.जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशाचे पालन करत त्यांनी ठरवून दिलेल्या सूचनांवर अंमलबजावणी करतांना दिसून येते मात्र याला अपवाद ठरलेली वडगांव नगरपंचायत आपल्या मनाला येतील ते निर्णय घेण्यात अग्रेसर झाल्याचे दिसत आहे.
दक्षिण उत्तर अशी एकमेव बाजारपेठ असलेल्या वडगांव शहरात नुकताच P 1 आणि P2 अशा सम आणि विषम तारखेला दुकाने उघडावीत असे आदेश मा.मुख्याधिकारी वडगांव यांनी पारित केले आहे.
वास्तविक पाहता व्यापारी प्रतिनिधीयांचे एकाचेही बोलणे ऐकून न घेता,इतर पक्षातील नेत्यांशी नगरसेवकांशी चर्चा न करता आणि स्थानिक भौगोलिक परिस्थिती लक्षात न घेता एकतर्फी हा निर्णय घेतला गेला आहे असे दिसत आहे.
व्यापारी बांधवांनी देखील याबाबत खुलासा केला आहे की राज्य शासनाने ठरवून दिलेल्या सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेचे पालन तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येईल असे देखील सांगण्यात आले मात्र तरीही याबाबत सकारात्मक निर्णय झालेला नाही.आज जर संबंधित अधिकारी यांनी बाजारपेठ फिरून पाहिली असती तर त्यांच्या देखील हे लक्षात येईल की एक दुकान बंद असल्यास दुसऱ्या दुकानात गर्दी वाढते ,आणि त्यामुळे सोशल डिस्टंसिंग चा पूर्णपणे फज्जा उडत आहे ( याबाबत आजचेच फोटो जोडत आहे) वडगांव ला इतरत्र जरी दुकाने असली तरी मुख्य बाजारपेठ ही एकच आहे .
ग्राहक / नागरिक जर त्यांच्या गरजेची
वस्तू घेण्यासाठी बाजारात आला आणि P 1 - P 2 च्या नियमाचा त्याला फटका बसला आणि संबंधित दुकान जर बंद असले तर त्याला विनाकारण फेरी पडते आणि गर्दी वाढते , त्याच दुकानदारावर या गर्दी चा ताण येत आहे याबाबत देखील नगरपंचायत अनभिज्ञ आहे असे दिसते.
नगरपंचायत - प्रशासन - व्यापारी- ग्रामस्थ यांचा योग्य तो समतोल राखला गेला पाहिजे याची देखील सर्वांनी दखल घेतली गेली पाहिजे.
या गोष्टीचा भारतीय जनता पक्ष- वडगांव शहर , युवा मोर्चा , व्यापारी आघाडी , महिला आघाडी,विद्यार्थी आघाडी आणि सर्व भाजपा नगरसेवक एक अपक्ष नगरसेवक जाहीर निषेध व्यक्त करत असून विनाकारण लादलेली P 1 - P 2 ची पद्धत तातडीने रद्द करून राज्य शासनाने दिलेल्या सकाळी 9 ते 7 यावेळेत दुकाने उघडावीत किवां पिंपरी चिंचवड सारखे 5 दिवस लॉकडाऊन करावे असे आदेश द्यावेत
अशी मागणी गटनेते दिनेश ढोरे,नगरसेवक किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, प्रविण चव्हाण,शहर अध्यक्ष किरण भिलारे,महिला अध्यक्षा धनश्री भोंडवे व्यापारी अध्यक्ष भुषण मुथा प्रसिद्धी प्रमुख अनंता कुडे,प्रसाद पिंगळे,विकी म्हाळसकर आदींसह भाजपचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केली असुन p-1, p-2 या निर्णयाचा व्हाट्सप व फेसबुक या द्वारे निषेध व्यक्त केला असून लवकरकच वरिष्ठ प्रशासनाला या संदर्भात निवेदन देणार आहे,असे मावळ भाजपाचे प्रसिद्धी प्रमुख अनंता कुडे यांनी सांगितले.
0 टिप्पण्या