वडगाव- मावळ तालुका भाजपायुवा मोर्चाच्या वतीने आज वडगाव येथील पक्ष कार्यालयामध्ये खासदार शरद पवार यांनी केलेल्या राम मंदिरावरील खोचक टिप्पणी संदर्भात त्याचा निषेध नोंदवून त्यांना मावळ तालुका युवा मोर्चाच्या वतीने एक हजारपेक्षा जास्त १००० पोस्ट आज जय श्रीराम लिहून पाठविण्यात आली आहे. या प्रसंगी मा.राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष गणेश तात्या भेगडे, मावळ तालुकाध्यक्ष रवींद्रआप्पा भेगडे, जि.प.सदस्य नितीनभाऊ मराठे, संदीपभाऊ काकडे, प्रभारी ज्येष्ठ नेते भास्करराव म्हाळसकर व सर्व अनेक प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या