मराठा जातीचे प्रमाणपत्र फार्म निशुल्क असून ते नागरिकांना कोणतेही शुल्क न घेता देण्यात यावे.
वडगाव मावळ - मावळ तहसील कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात मराठा जात प्रमाणपत्राचे फॉर्म पैसे घेऊन विकत असल्याचे निदर्शनास आल्यावर शिववंदना ग्रुपचे सदस्य यांनी या वर आवाज उठवला.फॉर्मवर कोणतेही शुल्क नसताना ते शुल्क नागरिकांकडून आकारले जाते त्या संबंधित कार्यालय व्यवस्थापकांना जाब विचारण्यात आला.
यावर चर्चा होऊन फॉर्म निशुल्क देण्याचे नागरी सुविधा केंद्राचे व्यवस्थापक प्रविण गायकवाड यांनी कबूल केले. यावेळी शिववंदना ग्रुप अध्यक्ष दिनेश ठोंबरे,शिवभक्त तुषार वहिले, शिवभक्त अशोक सातकर अनिल वायभट आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या