तळेगाव दाभाडे- डॉक्टर दिन , कृषी दिन व सीए दिना निमित्त या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये करोना योद्धा म्हणून आपल्या स्वतःची पर्वा न करता वैद्यकीय सेवेत काम करणारे डॉ. अनिल अुनकुले, डॉ.प्रवीण कानडे, डॉ.अनंत परांजपे. यांचा सन्मान करण्यात आला.
आपल्या देशावर करोना महामारीचे संकट असता अन्नदाता म्हणून आपली भूमिका निस्वार्थीपणे पार पाडणारे शेतकरी कुटुंबातील श्री अनंत रायकर,श्री भगवानराव भेगडे,श्री ज्ञानेश्वर भेगडे, श्री शिवाजीराव दाभाडे यांचा सत्कार करण्यात आला.
आपल्या देशाची आर्थिक व्यवस्था बळकट करण्याकरिता मोलाचा वाटा असणारे चार्टर्ड अकाऊंटंट श्री किशोर मावकर , श्री स्वानंद आगाशे यांचा सत्कार करण्यात आला
या प्रसंगी उपस्थित असलेले शहराध्यक्ष श्री रवींद्र माने,कार्याध्यक्ष श्री महेंद्र पळसे, कोषाध्यक्ष श्री सतीश राऊत , संघटनमंत्री श्री सचिन टकले, नगरसेवक सुरेश नाना दाभाडे सरचिटणीस श्री प्रमोद देशक, श्री रवींद्र भोसले, श्री विनायक भेगडे, ज्येष्ठ नागरीक आघाडी कार्याध्यक्ष श्री अनिल वेदपाठक,ओबीसी आघाडी अध्यक्ष श्री. नितीन पोटे,व्यापारी आघाडी अध्यक्ष श्री निर्मल भाई ओसवाल, उपाध्यक्ष सचिन आरते, सचिव श्री महावीर कणमुसे ,युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री सागर भेगडे हे मान्यवर उपस्थित होते.




0 टिप्पण्या