वडगाव - मावळ तालुक्यातील १७ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी राबवण्यात येणारी कार्ला प्रादेशिक पाणी पुरवठा आणि पाटण प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ह्या ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत करण्याचा ठराव जिल्हा परिषद,पुणे यांनी केला असून या ठरावाच्या विरोधात मावळ पंचायत समितीचे मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
मा. सभापती गुलाबराव म्हाळसकर हे जिल्हा परिषदेच्या ठरावा विरोधात माहिती देताना म्हणाले की मा.राज्यमंत्री संजय(बाळा) भेगडे यांनी मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील १७ गावातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी कार्ला प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून १३ कोटी ५४ लाख रुपये तसेच पाटण प्रादेशिक पुरवठा योजनेतून ९ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिली होता.त्याचे प्रशासकीय काम प्रगतीपथावर असताना जिल्हा परिषद,पुणे यांनी घेतलेला हा निर्णय चुकीचा आहे.
सदरच्या दोन्ही योजना ग्रामपंचायतकडे हस्तांतरित केल्याने जॅकवेल ते गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचा देखभाल खर्च,कर्मचाऱ्याचा खर्च ग्रामपंचायतला पेलवणार नाही.तसेच या कोरोना महामारीच्या काळात ग्रामपंचायत च्या निवडणुका रद्द करून प्रशासकाची नेमणूक करण्यात येणार आहेत.त्यामळे देखील योजना राबवण्याची समस्या निर्माण होणार आहे.या ग्रामपंचायत स्तरावर निर्माण होणाऱ्या समस्याकडे पण त्यानी लक्ष वेधले आहे.
उपसभापती दत्तात्रय शेवाळे :- मावळ पंचायत समितीचे सभापती,सदस्य,गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, आणि संबंधित १७ गावचे सरपंच यांची मिटींग पार पडली असून आमचा सर्वांचा जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा योजना हस्तांतराच्या ठरावास विरोध असून तो ठराव रद्द करण्यात यावा.





0 टिप्पण्या