Ticker

6/recent/ticker-posts

वाढीव वीजबील पाठविणार्या महाफशिव आघाडी सरकारचा पुणे जिल्हा भाजपा वतीने जाहीर निषेध

 पुणे -  कोरोना साथीच्या या भीषण संकटांच्या काळात सर्वत्र रोजगार बंद झाले आहेत. नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे, त्यामुळे लॉकडाऊन काळातील नागरिकांचे वीजबील  पूर्णपणे माफ करावे या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष पुणे जिल्हा ग्रामीणच्या वतीने मा.मंत्री हर्षवर्धनजी पाटील,मा.राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे,आ.राहुलजी कुल,आ.भीमरावजी तापकीर,जिल्हाध्यक्ष गणेशतात्या भेगडे यांच्या नेतृत्वाखाली विद्युत कार्यालय, रास्ता पेठ पुणे येथे आज जोरदार आंदोलन करण्यात आले.

कोरोना या महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये सामान्य माणसाला आर्थिक मदत मिळणे गरजेचे बनलेले आहे. राज्य सरकारच्या पॅकेजमधून सामान्य माणसाला कोणतीही थेट मदत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.नागरिकांना लॉक डॉउनच्या कालावधीमधील भरमसाठ वीज बिल आला आहे हा वीजबील पूर्णपणे माफ करण्यात यावा यासाठी विद्युत अभियंता यांना निवेदन देण्यात आले.या वेळी मावळतालुक्यातुन जिल्हा सरचिटणीस अविनाश बवरे, तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे ,ज्योती जाधव,युवा मोर्चा कार्यध्यक्ष अर्जुन पाठारे,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे ,तळेगाव अध्यक्ष रविंद्र माने,महेंद्र पळसे, नगरसेवक अरुन भेगडे,अजय भेगडे,विनायक भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते

 राज्य शासनाने लाँकडाऊन काळातील वाढीव वीजबील माफ केले नाही तर राज्यभर आंदोलन करणार - संजय तथा बाळा भेगडे ,मा.राज्यमंत्री महाराष्ट्र

---------------------
---------------------
----------------------
---------------------
                 ------- × × × ------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या