Ticker

6/recent/ticker-posts

लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीने एकाही घराचे कनेक्शन कापू नये अन्यथा महावितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकणार-मा.राज्यमंत्री संजय(बाळा) भेगडे

वडगाव-मावळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने वडगाव मावळ येथे महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या विरोधात मा मंत्री बाळा भेगडे,तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. 

           शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या वीज बिलामध्ये कुठल्याही प्रकारची मोजमाप न करता अन्यायकारक पद्धतीने वीज बिलामध्ये वाढ केलेली आहे ,याला भाजपचा विरोध आहे ही वीज बिले अन्यायकारक असून महाराष्ट्र सरकारने व महावितरण कंपनीने ती त्वरित मागे घेऊन लोकडाऊन काळातील नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना वीज बिले माफ करावे व ज्या भागात गेल्या महिन्याभरापासून लाईट नाही अश्या भागात वीज बील आकारू नये.
राज्यात सध्या लॉकडाउन सुरू आहे. यामुळे अनेकांच्या हाताला काम नाही. सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक स्थिती दोलायमान झालेली आहे. अशाही परिस्थितीत महावितरण कंपनीने अव्वाच्या सव्वा रकमेची विज देयके नागरिकांना दिली आहेत. नेहमीच्या तुलनेत दुप्पटीहून अधिक रकमेची बिले देण्यात आली आहेत,ही वीज देयके तातडीने दुरुस्त करून देण्याची मागणीही यावेळी मा.मंत्री बाळा भेगडे,तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे,युवाध्यक्ष संदीप काकडे,महिलाध्यक्ष सायली बोत्रे,मा.सभापती गुलाबराव म्हाळस्कर यांच्या मार्फत करण्यात आली. यावेळी मावळ तालुक्याचे तहसीलदार व महावितरणच्या उपअभियंत्यांना निवेदन देण्यात आले.

---------------------
---------------------
----------------------
---------------------
                 ------- × × × ------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या