Ticker

6/recent/ticker-posts

राज्यव्यापी दुध संकलन बंद आंदोलनाबाबत मावळ भाजपाचे तहसीलदार यांना निवेदन



वडगाव मावळ दि.२०: कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी विविध संकटांचा सामना करत असतानाच लॉकडाऊन काळात शहरातील हॉटेल्स,चहाची दुकाने बंद असल्याने दुधाची मागणी घटली आहे.दुध उत्पादक शेतकऱ्यांना अत्यल्प दराने दुध विक्री करावी लागत आहे.परंतु याच परीस्थितीत सर्वसामान्य लोकांना मिळणाऱ्या दूध दरात कुठलीही कपात करण्यात आलेली नाही.दुध विक्री दर पुर्वीइतकाच कायम आहे.मग शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करताना कमी दर का?महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांकडून रास्त दराने दुध खरेदी करण्याच्या केलेल्या घोषणेची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली नाही.

              दुध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यामुळे आज दुध उत्पादक आर्थिक संकटात आहे.म्हणून गायीच्या दुधाला प्रति लीटर १० रुपये अनुदान,दुध भुकटीकरीता प्रतिकिलो ५० रुपये अनुदान,शासनाकडून ३० रुपये प्रतिलीटर दराने दुधाची खरेदी या मागण्यांकरीता १ अॉगस्ट रोजी राज्यव्यापी दुध संकलन बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यासाठी मावळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मा.तहसीलदार यांना गायीचे दूध भेट देऊन मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.यावेळी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे,किरण राक्षे,सुनिल चव्हाण,सुभाषराव धामणकर,जालिंदर धामणकर,शेखर दळवी,सचिन येवले,नामदेव वारिंगे,ज्ञानेश्वर गुंड,मच्छिंद्र केदारी,बाळासाहेब गाडे,बाळासाहेब धामणकर,सुभाष तुपे,मनोहर तुपे,नारायण बोडके,अनंता वर्वे,शांताराम दरेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या