मावळ - मावळ तालुक्यातील कोंडीवडे गावातील शेतकरी अतुल चोपडे यांची मौजे नायगाव येथे वडीलोपार्जीत जमीन ही पार्टीवाले (जमिन खरेदीदार) खरेदी घेण्यापुर्वी त्यांचे अजोबा नामदेव कोडीबा चोपडे यांच्या नावावर होती त्यांनी कोणत्याही खरेदीदारास सही केली नाही ही पार्टीवाल्यानी खरेदी घेतली या जमीनीस अतुल चोपडे परिवाराचा अविभक्त हिस्सा असलेने त्यांनी जमिन मिळने कामी तहसिलदार,उपविभागीय अधिकारी पुणे यांच्याकडे अर्ज दाखल केला त्यावर वेळोवेळी सुनावणी होऊन केस निकालावर आहे. मा.तहसिलदार यांच्याकडे शेतकरी पुराव्याबाबत केस चालु असुन सुनावणीची दि १३/७/२०२९ रोजी तारीख दिली गेली आहे .
अतुल चोपडे यांचे म्हणणे आहे कि ही जागा माझी वडीलोपार्जीत असुन आमचा या मिळकती मधे अविभक्त हिस्सा आहे तसा हिस्सा मिळण्यासाठी आम्ही अर्ज संबंधित प्रशासना कडे, महाराष्ट्र शासनाकडे दाखल केला आहे. ही जागा पार्टीवाल्यांनी खरेदी घेतली असुन ते शेतकरी नाहीत खरेदीखत करता वेळी शेतकरी पुरावा जोडला नाही तसे त्यांनी जमिन एक्ट ६३ ची परवानगी घेतली नसुन यात तुकडा बंदी कायद्याचा भंग झाला आहे .
पार्टीवाले हे धनाधीश असुन माझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो माझ्यावर अन्याय होऊ शकतो जर माझ्यावर अंन्याय झाल्यास मी अत्मदहन करणार असुन याला जबाबदार संबंधित व्याक्ती प्रशासन असणार आहे.
0 टिप्पण्या