Ticker

6/recent/ticker-posts

स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जुलमी राजवट आणण्याचा महाभकास आघाडीचा डाव - अभिमन्यु शिंदे ,अध्यक्ष मावळ भाजपा विद्यार्थी आघाडी

मावळ - इंग्रज जुलमी राजवट गेली पण याचे भुत अजुनही उतरले नाही.महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जुलमी राजवट आणून त्यांचे अनुकरण करु पाहते आहे.ग्रामपंचायतमध्ये प्रशासक नियुक्ती ही प्रशासनातील अधिकारी किंवा विद्यमान सरपंच हा असला पाहीजे.परंतु शासनाने 13 जुलै रोजी शासन निर्णय जाहीर केला आहे. 

            ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदी संबंधित जिल्ह्याचा पालकमंत्री जे नाव सुचविल ते नाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  जाहीर करतील. वास्तविक या मुळे त्यांच्याच पक्षांतील काही मंडळींनी या प्रशासक नेमणूक करण्याबाबत धंदा चालवला आहे. फॉर्म भरण्याच्या नावाखाली पक्ष निधी गोळा करत आहे.काही ठिकाणी प्रशासक म्हणून नेमणूक होण्यासाठी लिलाव करून रक्कमेची बोली लावत आहे.
      
          ग्रामपंचायत हि स्थानिक स्वराज्य संस्थेतील ग्रामीण भागाची आदर्श संस्था आहे.ग्रामविकासाचा कणा आहे.याला तडा लावण्याचे काम महाविकास आघाडी शासन करत आहे.जनमत नसलेला अपात्र व्यक्ती त्या ठिकाणी बसवले जातील.मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जाईल. विकास कामे ठप्प होतील.अशी भीती जणसामान्य व्यक्त करत आहे.
 
                या बाबत भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी निवेदन दिले आहे.तसेच मावळ तालुका  भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष व उपसरपंच कामशेत अभिमन्यु शिंदे यांनी निषेध केला आहे.हा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या