Ticker

6/recent/ticker-posts

वडगाव शहरात नळांना गढूळ पाणी ग्रामस्त आक्रमक आंदोलनाचा इशारा

वडगाव मावळ - वडगाव शहरात गेल्या कित्येक दिवसांपासून नळांना गढूळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असून तातडीच्या उपाययोजना करण्यात याव्या असे निवेदन मा.मुख्याधिकारी  नगरपंचायत वडगाव यांना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने देण्यात आले.यावेळी युवा अध्यक्ष रमेश ढोरे, महिला अध्यक्षा धनश्री भोंडवे, शेखर वहिले,अतुल म्हाळसकर,राजेंद्र म्हाळस्कर,सागर भिलारे,विध्यार्थी आघाडी अध्यक्ष विकी म्हाळसकर,  युवराज म्हाळसकर, किरण येळवंडे, उपस्थित होते गढूळ पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित राहिला आहे त्वरित उपायोजना केल्या नाही तर युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
---------------------
---------------------
                 ------- × × × ------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या