Ticker

6/recent/ticker-posts

कामशेतमध्ये विना मास्क फिरणार्यांकडून कामशेत ग्रामपंचायतने केला दंड वसुल....

कामशेत
 -  कामशेत गावात कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ झाल्याने कामशेत ग्रामपंचायत खडकाळे(कामशेत)  यांच्यावतीने विना मास्क गावात फिरणार्यांवर पाचशे रुपये दंड आकारणी चालू केली आहे.
            कालपासून कामशेत शहरात कोरोणाचे रुग्ण वाढत असून आजपर्यंत संख्या पाच झाली आहे. अजूनही काही नागरिक नियमांचे पालन न करता विना मास्कचे कामशेत बाजारपेठेमध्ये फिरत असतात.यावर चाप बसण्यासाठी ग्रामपंचायत खडकाळे  वतीने दंड वसूल करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विना मास्क फिरणाऱ्यांवर पाचशे रुपये दंड वसूल केला जाणार आहे.
        नागरिकांनी घराच्या बाहेर निघताना मास्क घालूनच निघावे आणि सुरक्षेचे नियम पाळावे असे ग्रामपंचायत वतीने नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे.

अभिमन्यू शिंदे,प्रभारी सरपंच कामशेत :- नागरिकांनी काम नसताना विनाकारण बाहेर पडू नये.मास्क न लावता कोणी फिरतांना दिसल्यास त्याच्यावर ५०० रुपये दंडाची कारवाई केली जाईल.तरी नागरिकांनी कामानिमित्त बाहेर पडताना मास्क वापरावा.

---------------------
---------------------
----------------------
---------------------
                 ------- × × × ------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या