वडगाव मावळ: भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने मावळ तालुक्यातील बचत गट हे पंचायत समितीला जोडण्यात यावे असे निवेदन पंचायत समितीच्या सभापती सौ निकिताताई घोटकुले व ब्लॉक कमिशन तालुका अभियान व्यवस्थापक गायकवाड साहेब यांच्या वतीने प्रगती इंगळे यांना निवेदन देण्यात आले.
मावळ तालुक्यात अनेक बचत गट हे पंचायत समितीला जोडले गेले आहेत काही बचत गटांची कागदपत्रे दिली गेली आहेत परंतु ते अजून ऑनलाईन झाले नाही असे सर्व बचत गट जोडण्यात यावे तसेच काही गट पाच वर्ष दहा वर्ष गट चालतात;परंतु ते पंचायत समितीला जोडले गेले नाही असे सर्व गट पंचायत समितीला जोडले तर शासनाच्या विविध योजनांचा महिलांना लाभ घेता येईल तसेच तालुक्यात अनेक गावांमध्ये बचत गट सीआरपी नेमणूक केली गेली परंतु ज्या गावांमध्ये नेमणूक झाली नाही त्या गावांमध्ये देखील नेमणूक व्हावी म्हणजे बचत गट हे अधिक सक्षमपणे काम करतील.
निवेदन देण्यासाठी भाजप महिला आघाडी अध्यक्ष सौ सायलीताई जितेंद्र बोत्रे,कार्याध्यक्ष सौ सुमित्राताई जाधव, संघटन सरचिटणीस कल्याणीताई ठाकर,उपाध्यक्ष रोहिणीताई गाडे,उपाध्यक्ष मनीषाताई कुंभार,सचिव सपनाताई देशमुख,नाणे मावळ अध्यक्ष सिमाताई आहेर,पवन मावळ अध्यक्ष अश्विनीताई साठे,चांदखेड गण अध्यक्ष वैशालीताई घारे तसेच इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
0 टिप्पण्या