कामशेत - संपुर्ण जग कोरोना महामारी बरोबर लढत आहे. संपुर्ण देशामध्ये लाॅकडाऊन केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात हाल झाले. या लढाईत सर्वसामान्य जनतेला एक मदतीच पाठबळ म्हणून नेहमीच समाजकार्यात वरदहस्त असणारे साते गावचे युवा उद्योजक श्री. ॠषीनाथभाऊ मारूती आगळमे.(सरचिटणीस भाजपा वडगाव खडकाळा गट ) यांच्या वतीने गावातील सुमारे ४०० कुटुंबांना तरकारी किटचे वाटप करण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनी किराणा किटचे सुद्धा वाटप करण्यात आले.
या संकटातून सावरत नाही तर अचानक आलेल्या चक्री वादळाने सर्व सामान्यांची वाताहत केली. मोठ्या प्रमाणात शेतीचे व घरांचे नुकसान झाले. यात साते गावच्या रहिवासी श्रीमती. वंदना मारूती काजळे यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यात त्यांची आर्थिक स्थिती नाजुक आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी म्हणून वाढदिवसाचा होणारा अवास्तव खर्च टाळुन त्यांना रूपये अकरा हजारांचा धनादेश देण्यात आला.
0 टिप्पण्या