Ticker

6/recent/ticker-posts

पावसाळ्यात नागरीकांनी आरोग्य विषयी सुरक्षितता घ्यावी - अभिमन्यु शिंदे,उपसरपंच कामशेत

कामशेत -  "निसर्ग" चक्रीवादळामुळे मुसळधारपाऊस झालेने तसेच पावसाळ्याचे आगमन यामुळे इंद्रायणी नदी पात्रात डोंगरातील पाणी तसेच शहर भागातील नाले वाहत असलेने इंद्रायणी नदी पात्राचे पाणी हे दूषित झाले असुन पाण्याचा रंग बदलेला पाहायला मिळतो आहे.

          कामशेत शहरातील नागरीकांनाची ग्रामपंचायत खडकाळे(कामशेत ) नागरिकांची आरोग्याची काळजी घेण्यासाठी कटिबंध आहे. नागरीकांनी पावसाळ्यात साथीच्या रोगापासुन दुर राहण्यासाठी  दक्षता घेणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळून प्यावे, पाणी शुध्द करण्यासाठी क्लोरिन वापरावे  .
             
          सात दिवसांपेक्षा जास्त दिवस साठविलेल्या किंवा साचलेल्या स्वच्छ पाण्यात, धुणी-भांडी करण्यासाठी वापरण्यात येणारे पाण्याचे उघडे ड्रम्स, घराच्या आसपास पडलेल्या नारळाच्या करवंट्या, बांधकामासाठी वापरण्यात येणारे पाण्याचे हौद, हवाबंद झाकण नसलेले हौसिंग सोसायट्यांचे ओव्हरहेड टॅंक्स आदींमध्ये पाणी साचून डासांची निर्मिती होऊन त्यापासून मलेरिया होण्याची शक्यता असते. 
   
        या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळून प्यावे, पाणी शुध्द करण्यासाठी क्लोरिन वापरावे, इमारतीमधील आणि घरातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या साफ कराव्यात, शिळे, उघड्यावरील अन्नपदार्थ आणि कापलेली फळे खाऊ नयेत, रिकामे डब्बे असल्यास त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी. सेप्टीक टॅंक त्वरीत दुरूस्त करून घ्यावेत आणि सोसायटीचा परिसर स्वच्छ ठेवावा असे अवाहन करण्यात आले आहे.

विद्युत पुरवठा व्यवस्थित होत नसलेने कामशेत मधील काही विभागात पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.ग्रामपंचायत वतीने नव्याने  पाणी साठवणीसाठी आठ इंच पाईपलाईन टाकण्याचे काम चालु असुन लवकरच कामशेतकरांची पाणी टंचाई थांबनार आहे

----------------------
----------------------
---------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या