तळेगाव दाभाडे : कोरोणा विषाणू या महामारी रोगा मुळे मावळ तालुक्यात प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तळेगाव मधील उद्योजक पै.विनोद उर्फ बंदी भेगडे युवा मंच च्या माध्यमातून नागरीकांची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आरसेनिक अल्बम या होमोओपॕथीक औषधांचे वाटप डोळसनाथ काॕलणी,गणेश काॕलणी,ज्ञानेश्वर नगर,कुंभार वाडा ,भेगडेआळी, राजवाडा विभागात करण्यात आले.
गरीब गरजू ७०० नागरीकांना भाजीपाला विनोद उर्फ बंटी भेगडे युवा मंच वतीने देण्यात आला.यात मित्रवर्गानी सहभाग घेतला .
नागरीकांना सुरक्षा संबंधित कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने पुढील काही दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. कृपया शासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना पाळा.सार्वजनिक कार्यक्रम, गर्दीची ठिकाणे टाळा, स्वच्छता राखा, आपले हात सतत स्वच्छ ठेवा, शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड, रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका. ताप असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल आणि खोकला असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे अवाहन करण्यात आले.
------------------------------.
0 टिप्पण्या