Ticker

6/recent/ticker-posts

मावळ तालुका भाजपा महिला उपाध्यक्ष पदी सारिका शिंदे यांची निवड

वडगाव मावळ - भारतीय जनता पार्टी महिला आघाडी च्या उपाध्यक्षपदी सौ.सारिका रमेश शिंदे यांची निवड करण्यात आली सारिका शिंदे या यापूर्वी कामशेट नगरीच्या मा. सरपंच तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत.
वडगाव येथे झालेल्या भारतीय जनता पार्टी महिन्याच्या १ तारखेच्या मासिक मिटींग तसेच कोरोणा नियोजन बैठकी मधे महिला आघाडी वतीने मावळ तालुक्यातील गणातील,शहरातील नियुक्ती करण्यात आली.
या मधे सारिका शिंदे यांची नियुक्ती झालेचे जाहीर करण्यात आले ,या वेळी पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे,मा.राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे,तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे,मावळ तालुका महिला आघाडी अध्यक्ष सायलीताई, युवा मोर्चा अध्यक्ष संदिप काकडे,उपसभापती दत्ता शेवाळे, गुलाबकाका म्हाळस्कर, शांताराम कदम,संघटण मंत्री किरण राक्षे,सरचिटणीस सुनिल चव्हाण,संतोष कुभार, गण अध्यक्ष धनंजय टिळे, तालुका विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु  शिंदे,अमोल भेगडे,सचिन येवले,क्रीडा आघाडी अध्यक्ष नामदेव वारिंगे,दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंभोरे, वडगाव विद्यार्थी आघाडी अध्यक्ष विकी म्हाळस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
       सारिका शिंदे यांचा कामशेत मधे चांगला जणसंपर्क आहे.त्यांचे पती रमेश शिंदे हे भारतीय जणता पार्टी चे सक्रीय कार्यकर्ते आहेत.

----------------------
----------------------
---------------------


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या