Ticker

6/recent/ticker-posts

"निसर्ग" चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या फ्लोरीकल्चर शेतकऱ्यांना एकरी 10ते15 लक्ष रुपये मदत केंद्राने द्यावी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे मागणी


तळेगाव दाभाडे -  निसर्ग चक्रीवादळाच्या अनुषंगाने केंद्रीय कृषी मंत्री मा.नरेंद्रसिंग तोमर यांनी कोकण व पुणे जिल्हा या ठिकाणी झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरंसिंग द्वारे महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांशी सवांद साधला 

           त्यामध्ये #मा_राज्यमंत्री_बाळा_भेगडे यांनी मावळ व पुणे जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचा आढावा दिला व फ्लोरोकल्चर शेतकऱ्यांना एकरी 10ते 15लाख रुपये प्रमाणे पॅकेज मिळावे अशी मागणी केली त्याला उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्री मा.नरेंद्रसिंग तोमर यांनी असे नमूद केले कि राज्य सरकारला राज्य आपत्ती निवारण निधी राज्य सरकारला सुपूर्त केला असून केंद्रीय आपत्ती निवारण निधी साठी राज्यसरकारने केंद्राला योग्य तो प्रस्ताव पाठवावा त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल असे आश्वस्त यावेळी केले.

           या संवाद कार्यक्रमात प्रामुख्याने केंद्रीय कृषी मंत्री मा.नरेंद्रसिंग तोमर,मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील,विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,मा.मुख्यमंत्री नारायण राणे केंद्रीय सहसंघटन मंत्री वीर सतीशजी,संघटन मंत्री विजयराव पुराणिक,मा.विनोद तावडे,खासदार विनायक सहस्त्रबुद्धे आमदार रवींद्र चव्हाण,आमदार नितेश राणे,आमदार प्रशांत ठाकूर,आमदार प्रसाद लाड,आदी प्रमुख नेते उपस्थित होते.
--------------------
वसुंधरा न्युज मावळ
मो.नं.८४८२९६९६४४
----------------------
 
     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या