कामशेत - महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक बंदी हा योग्य निर्णय घेतला होता पण त्यावर जनजागृतीचा अभाव, प्रशासनाचे दुर्लक्ष अशा कारणांमुळे नागरीकांना या प्लास्टिक बंदीचा विसर पडलाय.प्लास्टिक मुळे पर्यावरणाची खुप मोठे न भरुन येणारे नुकसान होत आहे.
कामशेत ही मावळ तालुक्यातील मोठी बाजारपेठ असुन प्लास्टिक चा वापर हा मोठ्या प्रमाणात होत आहे. येत्या पावसाळ्यात याचा दुष्परिणाम हा नदी ,नाले ,गटारे यावर होताना दिसते . कचर्या मधे ४०% प्रमान हे प्लास्टिक चे पाहायला मिळते आहे.
यावर उपाययोजना म्हणुन ग्रामपंचायत खडकाळे (कामशेत) वतीने शासनाने निर्बंध घातलेल्या प्लास्टिक वर बंदी आणण्याचा विचार चालु असुन लवकरच कामशेत मधील सर्व राजकीय पक्षातील प्रतिनिधी ,व्यापारी आणि नागरीकांना विश्वासात घेऊन योग्य निर्णय घेऊ असे उपसरपंच अभिमन्यु शिंदे यांनी सांगितले आहे.यावर योग्य उपाययोजना केल्यास कामशेत मधील कचर्याचा प्रश्न ही सुटणार आहे.
ग्रामपंचायत खडकाळे वतीने यावर जनजागृती करणार असुन नागरीकांनी तसेच पर्यावरप्रेमी संघटनानी ग्रामपंचायत यांना सहकार्य करावे असे अवाहन करण्यात आले आहे,
0 टिप्पण्या