कामशेत - राज्य शासनाच्या वतीने शाळा सुरु करणेबाबत ग्रामस्तांच्या सुचना मागवन्यात आल्या असलेचे पत्र अलेने त्या अनुशंगाने पंडीत नेहरु विद्यालय कामशेत मधे सरपंच ,उपसरपंच ,शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधी ,ग्रामस्त यांची मिटींग घेण्यात आली . या मिटींग मधे कोरोणा विषाणु प्रादुर्भाव लक्षात घेता .शाळा सद्या स्थिती मधे शाळा सुरु न करता अॉनलाईन पद्धतीने घेण्याच्या सुचना करण्यात आल्या .विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षे वाया जाऊ नये याचाही या वेळी विचार करण्यात आला.या वेळी प्राचार्य श्री शेंडेसर, डॉ विकेश मुथा , शंकरनाना शिंदे ,उपसरपंच अभिमन्यु शिंदे,वाघमारेसर यांनी सुचना मांडल्या यावेळी सरपंच रुपालीताई शिंनगारे ,मा.उपसरपंच संतोष कदम,मा.उपसरपंच तान्हाजी दाभाडे,वाघमारेसर,सुभाष रायसोनी,गणेश भोकरे,सौ.बालगुडेताई,दहीतुले सर ,ग्रामस्त आदी शिक्षण वृंद वर्ग उपस्थित होते.
पंडीत नेहरु विद्यालय कामशेत मधे सद्या स्थिती मधे दोनहजार विद्यार्थी संख्या आहे अशा स्थिती मधे शाळा सुरु करणेयोग्य होणार नाही या मधे सोशल डिस्टंन्सचे पाळण करणे आवघड ठरेल - अभिमन्यु शिंदे ,उपसरपंच कामशेत ,भाजपा विद्यार्थी आघाडी मावळ विधानसभा



0 टिप्पण्या