उपविभागीय परिसराचा विद्यूत पुरवठा निसर्ग वादळाचा प्रभावामुळे खबरदारी म्हणून बंद ठेवण्यात आला आहे. वादळाची तीव्रता कमी झाल्या वर टप्प्या टप्प्यानी , पडलेले पोल, तुटलेल्या तारांची पाहणी केल्या नंतर पूर्वव्रत करण्यात येईल. ज्या भागात मोठ्या प्रमाणात पोल पडले किंव्हा तारा तुटल्या असल्यास विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास विलंब होण्या ची शक्यता आहे.
आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तळेगाव उपविभागामध्ये उच्च दाब पोल 13, लघु दाब पोल 16 पडले असुन वाकलेल्या पोल उच्च दाब 09 आणि लघु दाब 12 असे आहेत, त्याचबरोबर झाडे आणि झाडांच्या फांद्या पडून सुमारे उच्च दाब वहिनी 12 ठिकाणीच्या आणि लघु दाब वहिनी 52 ठिकाणीच्या तारा तुटलेल्या आहेत, तरी सदर काम टप्याटप्याने पूर्ण करून वीज पुरवठा सुरू करण्यात येईल, परंतु तळेगाव ला वीज पुरवठा करणारे 100 KV सबस्टेशन ला येणारी टॉवर लाइन तुटल्याने पुर्ण सबस्टेशन बंद आहे, ते चालु झाल्यानंतर पुढील वीजपुरवठा सुरक्षेच्या दृष्टीने सर्व तपासणी करूनच चालु करण्यासाठी प्रयत्न चालु आहेत
नागरीकांनी निसर्ग चक्री वादळाच्या तडाख्यामुळे जर आपल्या परिसरात इलेक्ट्रिक खांब कोसळला असल्यास, वीज वाहिनी तुटल्यास किवा रोहित्र जळाल्यास महावितरणच्या टोल फ्री नंबर १८०० २३३ ३४३५ / १८०० १०२ ३४३५ / १९१२ वर त्वरित संपर्क करण्याचे अवाहन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या