तळेगाव दाभाडे - जि.प.सदस्य नितीनभाऊ मराठे यांच्या प्रयत्नातून मा.राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांच्या हस्ते आरोग्य कर्मचारी,आशासेविका यांना सुरक्षा किट (PPE किट,N95 मास्क,फेसशिल्ड,सॕनिटायजर,हॕन्डग्लोव्हज,पल्स मीटर,सुरक्षा गॉगल वाटप करण्यात आले.
तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुसज्ज इमारतीसाठी जिल्ह्याचे सहपालकमंत्री असताना विशेष बाब म्हणून ५ कोटी रु.मंजूर केले होते.ग्रीन बिल्डिंग मॉडेल म्हणून विकसित होत असलेल्या या इमारतीच्या कामाचा आढावा मा.राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी घेतला.
गटविकास अधिकारी श्री.माळी साहेब यांनी आरोग्य सेवकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन करुन पंतप्रधान सुरक्षा विमा योजना व पंतप्रधान जीवनज्योती विमा योजनेची माहिती दिली.
यावेळी नगराध्यक्षा सौ.चित्राताई जगनाडे,तालुकाध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे,शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने,कार्याध्यक्ष महेंद्र पळसे, गटनेते अमोलजी शेटे,नगरसेविका शोभाताई भेगडे,आरोग्य अधिकारी श्री.चंद्रकांत लोहारे साहेब,डॉ.कानडे साहेब,संघटनमंत्री सचिनभाऊ टकले,खजिनदार सतिष बाप्पू राऊत,सरचिटणीस रविंद्र साबळे ,प्रदिपजी गटे,रविंद्र भोसले,महिला मोर्चा अध्यक्षा मोहिनीताई भेगडे,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष शुभम कुल,अनुसुचित आघाडी अध्यक्ष सुनिलभाऊ कांबळे,उपाध्यक्ष आशुतोष हेंद्रे,विनोद भेगडे,गेणेश आप्पा भेगडे,चिटणीस तुषार दळवी,महावीर कणमुसे,प्रसिद्धी प्रमुख महेश सोनपावले,निलेश मराठे हे उपस्थित होते.

0 टिप्पण्या