वडगाव मावळ - अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेले "निसर्ग"चक्रीवादळामुळे मावळ तालुक्यात काल पासुन वेगाने वारे तसेच मुसळधार पाऊस पडत आहे या मुळे तालुक्यात काही ठिकाणी विद्युतपुरवठा खंडीत झाला असुन काही गावे अंधारात आहे.
तहसीलदार कार्यालय मावळ यांच्याकडून जाहीर चेतावणी वजा सूचना देण्यात आल्या आहेत
धोकादायक असलेली घरे विशेषता पत्र्याचे असलेले शेड अथवा घरे यामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी तात्पुरत्या स्वरूपात रात्रीच्या वेळी जवळच्या शाळा अथवा सरकारी इमारतीमध्ये आश्रय घ्यावा
स्थानिक प्रशासन तथा ग्रामपंचायत यांनी तातडीने तशी दवंडी देऊन नागरिकांना निसर्ग चक्रीवादळा बाबत जागरूक करावे
कुठलीही जीवित अथवा वित्त हानी होणार नाही यांची गावपातळीवरील स्थानिक प्रशासनाने काळजी घ्यावी
गावांमध्ये असलेले जेसीबी तथा पोकलेन यांचे मालकांनी आपत्तीच्या काळामध्ये प्रशासनाला व जनतेला मदत करण्यासाठी तयार राहावे
ग्रामपंचायत स्तरावर तातडीने मदत केंद्र तयार करून तालुका प्रशासनाच्या मदतीने येणाऱ्या संकटाशी लढण्यासाठी सतर्क राहण्याचे अवाहन करण्यात आले आहे.
तुम्ही आता LIVE बघू शकता कि वादळ कुठे आहे
या लिंक वर पहा windy.com

0 टिप्पण्या