मावळ - जगभरात कोरोणाचा कहर त्यामुळे झालेला जनजीवनावरील परिणाम आणि निसर्ग चक्री वादळाचा कोप अगदी संकटावर संकट आले.निसर्ग चक्री वादळात अनेकांचे संसार उध्वस्त झाले होते घरांची मोडतोड झाली. राहण्याची हेळसांड झाली तर खाण्या पिण्याची आबाळ झाली अशातच बजरंगदल सारखी विश्व व्यापक संघटना मदतीला आली आणि केले मोडलेलेले संसार पुन्हा नव्याने अभे केले आहेत.
आंदर मावळ मधिल आदिवासी पाड्यांवरील बांधवांना वादळाचा खुप मोठा फटका बसला, भोयरे येथिल ठाकरवाडी, कल्हाट येथिल कातकरी वस्ती या वाड्यांना मदतीचा हात देत केल सेवा कार्य , घरांवरील छप्पर नव्याने निर्माण करण्यात आलं, पडलेल्या भिंतींना कागद, कारव, दगड, माती लावुन उभी करण्यात आल्या. घरात लागणार्या जिवनावश्यक वस्तु, कोरडा शिधा किट देण्यात आले, आंगावर पांगरुन म्हणुन ब्लॅकेट देण्यात आले, माता भगिनींना साड्या वाटप करण्यात आल्या, अंथरण्या साठी चटया देण्यात आर्या पुरुषांना कपडे देण्यात आले, लहानग्यांना खाऊ सोबत कपडे देण्यात आले. !!
प्रत्येक घरात प्रभु श्रीरामांचा फोटो देण्यात आला असुन नित्य पुजेचा संकल्प देखील सर्व बांधवांनी केला .सर्वोतोपर काळजी घेवुन, सुरक्षित अंतर ठेवुन, मास्क, रुमालाचा वापर करुन, सॅनिटायझर ची फवारणी करुन दक्षता घेवुन वाटप करण्यात आले..!
बजरंगदल कडुन वनाटी फणसराई, राजमाची तसेच कांब्रे पठारावरील बांधवांना अशाच प्रकारच्या मदतीच सहकार्य करण्यात आलं स्थानिक आदिवासी बांधवांनी बजरंगदलाच्या स्वयंसेवकांना अगदी देवदुत म्हणुन संबोधल यासाठी तळेगाव नगरपालीकेतील कर्मचारी वर्गाकडुन सहायता करण्यात आली तसेच वडगाव येथील सामाजीक कार्यकर्ते गणेश वहिले यांचही सहकार्य लाभल .
या वेळी बजरंगदलाचे विभाग संयोजक संदेश भेगडे, जिल्हा संयोजक बाळ खांडभोर, विकी शेटे, मयुर शेटे, योगेश खांडभोर,उपस्थित होते माहिती संकलन महेंद्र असवले, नितिन भांग्रे, शुभम दरेकर यांनी केले. तर दिपक दरेकर, जयश शेटे, रोशन चौधरी, विनायक लालगुडे ,निखिल शेटे यांनी वाटप केले .
0 टिप्पण्या