वडगाव -दि २५ वडगांव मावळ येथे काही अज्ञात क्रूरकरम्यानी श्री भरत म्हाळसकर यांच्या गाई चरायला गेल्या असता त्यांच्यावर ऍसिड हल्ला केला व नीचतेचा कळस केला आहे हे कृत्य करणाऱ्या नराधमांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद बजरंग दल गोरक्षण विभागाच्या वतीने वडगांव पोलीस निरीक्षक श्री निंबाळकर यांच्याकडे करण्यात आली
यावेळी संतोषभाऊ भेगडे, खामकर, महेंद्र असवले, अमोल पगडे, मोरेश्वर पोफळे, नवनाथ मोढवे, प्रतिक भेगडे, यशवंत शिंदे, पत्रकार विजय सुराणा, सुदेश गिरमे, व अनेक गोरक्षक यांनी या कृत्याचा निषेध केला.
आपल्या देशात गौ माताचे पुजन होते जर असे कृत्य होत असेल तर ते निंदनीय आहे. कृत्य करणाऱ्या नराधमांना पोलीसांनी पकडून त्यांच्यावर कडक कारवाई पाहीजे - संतोष भेगडे पाटील अध्यक्ष शिव-शंभु स्मारक समिती तळेगाव दाभाडे
0 टिप्पण्या