कामशेत - लोकडाऊनचा असाही एक चांगला उपयोग करून केले वृक्षारोपण व तीचे संवर्धन करण्याची योजना केली असुन कामशेत आणि खामशेत मधे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कामशेत स्वयंसेवक व काही पर्यावरण प्रेमी यांनी एकत्र येऊन मागील महिनाभरा पासून याचा नियोजनपूर्वक विचार केला, सलग १६ दिवस श्रमदानातून खड्डे खोदले गेले, देशी, औषधी व फळझाडे आवाहन करून देणगीरूपी (अंदाजे २०००) झाडे मिळवली, ग्रामपंचायत खडकाळे कडून जंतुनाशक पावडर मिळवली व काल रविवार दिनांक १४ जुने रोजी सकाळी ६.३० वाजता सरपंच सौ शिनगारे ताई यांचे हस्ते विधिवत वृक्ष लावून सुरवात करणेत आली, या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, माजी सरपंच उपसरपंच व निराधार एकता संघाचे विद्यार्थी मोट्या संख्येने हजर होते, पुढे झाडांना आधारासाठी काट्या व दोऱ्या बांधणे, पावसाळ्या नंतर झाडे जगवणे साठी काही लोकांना पालकत्व देणे, लक्ष ठेवणे, पाणी देने आदी कामे सातत्याने केली जातील याचाही विचार झालाय.
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षीही सुस्वरे। आळविती।।
येणे सुख रुचे एकांताचा वास।
नाही गुणदोष। अंगी येत।।
पक्षीही सुस्वरे। आळविती।।
येणे सुख रुचे एकांताचा वास।
नाही गुणदोष। अंगी येत।।
कामशेत शहरात संघाच्या माध्यमातून मोट्या प्रमाणात आर्सेनिकम अल्बम या रोग प्रतीकार शक्ती वाढविणे औषधाचे 30 गोळ्या प्रत्येक कुटुंबास वाटप केले आत्ता पर्यत एकहजार कुटुंबास वाटप केले असुन अजुनही कार्य चालु आहे.



0 टिप्पण्या