कामशेत दि.१५ :- कामशेट मधील दहा वर्षाची वेदश्री संजय पानकर तिला सरपंच व्हायचे असा हिराबाई पानकर यांना ती रात्रभर असा बाल हट्ट करत रडत होती शेवटी तिच्या आजी ने दुसर्या दिवशी तिला ग्रामपंचायत खडकाळे(कामशेत) मध्ये आणले तिला समजून सांगण्यासाठी ,उपसरपंच अभिमन्यूू शिंदे,मा.उपसरपंच गणपत शिंदे यांना विनंती केली
त्यानंतर तिची समजूत काढण्यासाठी तिला ग्रामपंचायत मधील सरपंचाच्या खुर्चीवर बसवले त्या वेळेस तीचा हा आनंद गणनात मावेनासा झाला होता.त्याच बरोबर तिला अभ्यास करून मोठं होण्यास सांगितले स्वतःसाठी व आईवडीलासाठी आणि समाजासाठी काम करण्यासाठी सांगितलं वेदश्री इंग्रजी माध्यमातून शाळा शिकत असुन इयत्ता सहावी मधे आहे.
वेदश्री ही रात्रभर मला सरपंच व्हायचे असे म्हणत रात्रभर रडत होती शेवटी नाईलाजाने मी ग्रामपंचायत मधे आणने येथील प्रशासनाचे प्रेमाने नातीचा बालहट्ट पुर्ण केला या बद्दल आभारी आहे - हिराबाई पानकर ,आजी
0 टिप्पण्या