चक्रीवादळ झाल्यापासून आजपर्यंत मावळ तालुक्यातील आंदर,नाणे,पवन मावळातील काही गावातील वीजपुरवठा पुरवत झाला नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होतं आहे.महावितरणचे अधिकारी,कर्मचारी सतत कार्यरत असून लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
विजेअभावी नागरिकांची,शेतकऱ्यांची गैरसोय होतं आहे.नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे.विजेअभावी पीठ गिरण्या बंद असल्याने महिला वर्गापुढे दळण दळून आणण्याची समस्या निर्माण झाली आहे. वीज नसल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्या वीजपंप बंद असल्याने भरता न आल्याने नागरिकांना विहिरी,तळे यांवर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. काही शेतकरी विहीर,तळे,बोअरवेलच्या पाण्यावर विजपंपाद्वारे शेती करत असतात त्याच्यापुढे शेतीला पाणी देण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
0 टिप्पण्या