चांदखेड दि.१२: लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मावळ तालुका भाजपच्या वतीने चांदखेड येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मावळ तालुका भाजप दिव्यांग आघाडीच्या वतीने दिव्यांग बांधवाना अन्नधान्य किटचे वाटप तसेच पावन मावळ भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्ष अश्विनीताई साठे वतीने चांदखेड पंचायत समिती गणातील प्रत्येक ग्रामपंचायतीला सॅनिटायझर डिस्पेन्सर स्टँड चे वाटप करण्यात आले.
यावेळी मा.राज्यमंत्री बाळा भेगडे ,भाजपचे तालुकाअध्यक्ष रविंद्र भेगडे,पंचायत समितीच्या सभापती निकिताताई घोटकुले,जि.प सदस्या अलकाताई धानिवले, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक शामराव राक्षे,भाजपचे संघटनमंत्री किरण राक्षे,सरचिटणीस सुनिल चव्हाण,भाजपा दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंभोरे,भाजपा महिला आघाडी अध्यक्ष सायलीताई बोत्रे,बाळासाहेब घोटकुले,अाश्विनीताई साठे,सुमित्राताई जाधव,अजित आगळे,संतोष राजीवडे,रमेश येवले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या