लोणावळा - "निसर्ग "चक्रीवादळामुळे मावळ तालुक्यातील राजमाची,वनाटी,फणसवाडी,उदेवाडी या गावाचे भयंकर असे नुकसान झाले होते,मा.राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी त्याचवेळी फोन करून माहिती घेतली होती परंतु मोठ्याप्रमाणात झाडांची पडझड झाल्यामुळे जाणे शक्य नव्हते,त्यामुळे आज राज्याचे मा.मदत व पुनर्वसन राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांना समवेत घेऊन प्रत्यक्ष भेट देऊन नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली.
पाहणी दरम्यान असे निदर्शनास आले कि भरपूर घरांची 100% नुकसान झाले असून आज त्यांच्या राहण्याची गैरसोय होत आहे यावेळी मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी गावाचे सर्वेक्षण पूर्ण करून लवकरात लवकर माहिती आमच्या पर्यंत पोहचवावी आम्ही आपल्याला पक्के घर बांधण्यासाठी मदत करू व गेल्या काही दिवसांपासून गावात लाईट नसल्याने गावामध्ये प्रथमतः इन्व्हर्टर उपलब्ध करून देण्यात येणार असून जेणेकरून मायमाऊली,लहानबाळे अंधारात राहू नये व मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते गावातील कुटुंबाना तेल,डाळ,पीठ,मसाले अश्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी प्रत्यक्ष गावात भेट जो धीर दिला एक कुटुंब म्हणून आज ते मदतीला धावून आले त्याबद्दल गावकऱ्यांनी मनापासून बाळाभाऊंचे आभार मानले.
याप्रसंगी जिल्हापरिषद सदस्य नितीन मराठे,प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे,प्रदीप हुलावळे,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष तसेच उपसरपंच अभिमन्यू शिंदे,सरपंच संदीप उंब्रे,सुरेश भाऊ,विशाल पाडळे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.



0 टिप्पण्या