Ticker

6/recent/ticker-posts

मोदी सरकार 2.0 च्या वर्षपूर्ती निमित्ताने भाजपाच्या जनसंपर्क अभियानाचा वडगाव येथे शुभारंभ


वडगाव मावळ - लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपने संपूर्ण देशभर वर्षपूर्ती जनसंपर्क अभियानाचे आयोजन केले आहे.या अभियानात भाजप कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधून लिहलेल्या पत्राचे घरोघरी जाऊन वाटप करणार आहेत.या पत्रामध्ये मागील वर्षभरात केंद्र सरकारने घेतलेल्या अनेक महत्वपूर्ण निर्णयांचा व केलेल्या कार्याचा अहवाल मांडलेला आहे.

            मावळ तालुका भाजपच्या वतीने या अभियानाची सुरुवात वडगाव येथून करण्यात आली.यावेळी मा.राज्यमंत्री बाळा भेगडे ,भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे,माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,सुनिल चव्हाण,सुमित्रा जाधव,जितेंद्र बोत्रे,संदीप काकडे,सुनिल वरघडे,सुभाष धामणकर यांच्यासह वडगाव शहर भाजपचे अध्यक्ष किरण भिलारे,प्रसाद पिंगळे,धनश्री भोंडवे,रमेश ढोरे,भूषण मुथा,नगरसेवक किरण म्हाळसकर,शामराव ढोरे,विजय जाधव,शरद मोरे,रविंद्र म्हाळसकर,नामदेव वारींगे,विकी म्हाळसकर,वैशाली म्हाळसकर,वैशाली ढोरे,आश्विनी बवरे,स्नेहल बाफना आदी कार्यकर्ते उपस्थित होते.किरण राक्षे यांनी सूत्रसंचालन केले.अनंता कुडे यांनी सर्वांचे आभार मानले.
------------------------------
वसुंधरा न्युज मावळ
 मो.नं.८४८२९६९६४४
----------------------
---------------------
---------------------
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या