मावळ - निसर्ग चक्रीवादळामुळे मावळ तालुक्यातील लोणावळा परिसरातील वनक्षेत्रात फणसराई, वनाटी, उदेवाङी व राजमाची या अतीदुर्गम भागातील वननीवासी ठाकर, कातकरी बांधवांच्या घरांची झोपड्यांची गोठयांची प्रचंड हानी झाली होती.
घरांवरील छत उडुन गेले होते, घरातील भांडी, कपडे व अन्य साहित्य वादळाच्या तडाख्याने दरीत उडून गेले होते अशात अन्नधान्य भिझल्यामुळे खाण्याची बिकट अवस्था झाली होती. अनेकांचे संसार मोडुन पडले. या नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेल्या संकटात विश्व हिंदु परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते कर्तव्यबुद्धीने पुढे आले. चिंचवड येथील इस्कॉन कृष्णभक्त मंडळ सोबत सहभागी झाले. निसर्ग चक्रीवादळाच्या दुसर्याचं दिवशी कार्यकर्त्यांनी परिसरात जाऊन झालेल्या हानीची पाहणी केली व बांधवांना धिर दिला सोबत लगोलग वनाटी व फणसराई येथील सर्व कुटुंबांस आवश्यक शिधा संच पुरविण्यात आले. दि ५ जुन ते ९ जुन सलग ५ दिवस कार्यकर्त्यांनी पीडित बांधवांची पङलेली, विस्कटलेली घरे बांधून देण्यासाठी सुमारे ३५ मोठ्या ताडपत्र्या, मुबलक प्रमाणात दोर, तार असे नवीन साहित्य दानशूर व्यक्ती व संस्थांच्या सहकार्यातून उभे केले. श्रमदान करून घरे, झोपड्या पुन्हा निवासायोग्य करून दिल्या. प्रत्येक कुटुंबास दोन ब्लँकेटस, माता भगिनींस साड्या, लहान मुलांना नवे कपडे, खाऊ, पुरुष मंडळींना कपडे पुरवून परिसरात औषध फवारणी करून स्वच्छता करण्यात आली.
वाड्यांवर वृक्षारोपण करण्यात आले.
आगामी काळात लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासन यांच्याशी पाठपुरावा करून बाधित घरे व परिवारांचे योग्य पुनर्वसन व्हावे त्यांची निवासी घरे शासकीय नोंदीने नियमित व्हावीत यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे सर्व स्थानिक कार्यकर्ते सर्वंकष प्रयत्न करणार असा संकल्प करून त्यांस पूर्ण विश्वास व धीर दिला.
करोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करित योग्य ती काळजी घेऊन प्रस्तुत कार्य केले गेले. या दिवसात प्रतिदिवस वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी आळीपाळीने जाऊन कार्य केले. या वेळी बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र संयोजक लहुकुमार धोत्रे, अशोक येलमार, धनाजी शिंदे, संदेश भेगडे, मुकुंद चव्हाण, कुणाल साठे, अमित भेगङे, नाना सावंत, संभाजी बालघरे, अभिजीत शिंदे, बाळासाहेब खांङभोर आदि कार्यकर्त्यांनी श्रमदानात भाग घेतला तर पाहणी, माहिती संकलन व शिधावीतरण कार्य प्रवीण देशमुख, अजय शेलार, शुभम कुल, गणेश निसाळ, अक्षय भेगडे, विनायक भेगडे व श्रीनिवास कुंडल यांनी पार पाडले.
0 टिप्पण्या