Ticker

6/recent/ticker-posts

ग्रुप ग्रामपंचायत खडकाळाच्या उपसरपंचपदी अभिमन्यू प्रकाश शिंदे यांची बिनविरोध निवड..

कामशेत - ग्रुप ग्रामपंचायत खडकाळाचे विद्यमान उपसरपंच संतोष कदम  यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी सरपंच रुपालीताई शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक प्रताप माने निवडणूक घेतली.अभिमन्यू शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याने उपसरपंचपदी त्याची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
     खडकाळा ग्रुप ग्रामपंचायत मधे भाजपाची एक हाती सत्ता असल्याने सरपंच, उपसरपंच निवडीची बिनविरोधाची परंपरा राखण्यासाठी विरोधी पक्षातील सदस्याने सहकार्य केले.
              यावेळी मा.सभापती राजाराम शिंदे,सरपंच रुपालीताई शिनगारे,ग्रामसेवक प्रताप माने,ज्येष्ठ नेते शंकरराव शिंदे,मा.सभापती राजाराम शिंदे, मावळते उपसरपंच संतोष कदम,मा.उपसरपंच गणपत शिंदे,काशिनाथ येवले,नितीन गायखे, मा.सरपंच सारिका शिंदे,सारिका घोलप,रोहिणी मुथा,जनाबाई पवार,ग्रा.प.सदस्य सरिता पवार,विरोधी पक्षनेते विजय दौंडे,गजानन शिंदे,संतोष काळे,पो.पाटील रोहिदास शिंदे,मा.सरपंच विजय शिंदे,भरत शिंदे,तुकाराम शिंदे,भाजपा अध्यक्ष मोहन वाघमारे,शंकर शिंदे,युवराज शिंदे,वैभव शिंदे,  आदी मान्यवर उपस्थित होते.

कामशेत शहराचा विकास हाच आमचा प्रयत्न असुन नागरीकांनी सहकार्य करावे - अभिमन्यु शिंदे ,विद्यमान उपसरपंच कामशेत 
--------------------
वसुंधरा न्युज मावळ
मो.नं.८४८२९६९६४४
----------------------
 
     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या