मावळ : देशावर आलेल्या कोरोना विषाणू च्या साथीच्या रोगामुळे कामगार हवालदिल झाला आहे. काम नसल्या मुळे कामगारांना सुखरुप घरी जाण्यासाठी लोणावळा नगरपालिका हद्दीतील तसेच बाहेर गावातील कामागार यांना तेलंगना राज्य येथे जाण्यासाठी नगरपालिका मार्फत बस करण्यात आली .
सुरक्षेचे नियम पाळून कामगारांना त्यांच्या गावी निरोप देताना नगराध्यक्षा सुररेखाताई जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेवक गटनेते देविदास कडू ,नगरसेविका रचना सिनकर तसेच मुख्याधिकारी सचिन पवार पी आई स्वामी साहेब कवडे साहेब नगरपालिकेतील सर्व कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.या याठी लोणावळा नगरपालिका यांनी विशेष प्रयत्न केले.
-----------------------------------------------
0 टिप्पण्या