मावळ : आज भारतीय जनता पार्टी-तळेगाव दाभाडे शहर आणि नगराध्यक्षा-गटनेते यांच्यावतीने मावळचे तहसीलदार मा.मधुसुदन बर्गे साहेब यांना तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमध्ये कोरोना संसर्ग उपाययोजना संदर्भात होणाऱ्या मनमानी कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यातील विसंवादामुळे उपाययोजना करण्यासंदर्भातील वेळोवेळी बदलले जाणारे विविध निर्णयांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
प्रशासनाने नगराध्यक्षा,गटनेते व सर्वपक्षीय नगरसेवक-नगरसेविका यांच्याशी योग्य समन्वय ठेवण्याबाबत पत्र दिले.त्याचबरोबर परराज्यात व परजिल्ह्यात जाणाऱ्या स्थलांतरितांसाठी काय व्यवस्था केली जात आहे.किंवा जाण्यासाठी परवानगी संदर्भातील माहिती आपण प्रसिद्धीस द्यावी जेणेकरुन सर्व स्थलांतरित बांधवांना योग्य माहिती मिळेल व त्यांची यातून होणारी ससेहोलपट थांबेल यासंदर्भात निवेदन देऊन चर्चा केली.
यावर तहसीलदार साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत नगराध्यक्षा व गटनेते यांना विश्वासात घेण्याचे आश्वासन दिले.
यावेळी शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने,नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे,कार्याध्यक्ष महेंद्र रामचंद्र पळसे,गटनेते अमोल जगन्नाथ शेटे,नगरसेवक अरुण जगन्नाथ भेगडे,गणेश आप्पा भेगडे,संघटनमंत्री सचिन टकले,खजिनदार सतिष राऊत,सरचिटणीस रवि साबळे,प्रदिप गटे,रविंद्र भोसले,विनायक भेगडे हे उपस्थित होते.
1 टिप्पण्या
छान....धन्यवाद
उत्तर द्याहटवा