मावळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहराच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष,नगरसेवक, नगरपालिका प्रशासन,पोलीस प्रशासन कोरोनाचा शहरात शिरकाव होऊ नये म्हणून दिवसरात्र कार्य करताना दिसत आहे.त्याचबरोबर तोंडावर आलेल्या पावसामुळे शहरातील विकास कामे रखडून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रलंबित विकासकामांचा पाठपुरावा करणे,रखडलेल्या कामाची पाहणी करून काम पूर्ण करण्याचे प्रयत्न करत आहे.
त्याचधर्तीवर मा.राज्यमंत्री संजय(बाळा)भेगडे यांच्या मागणीतून मा.वित्तमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी कुसगाव ते कैलासनगर,लोणावळा या रस्त्यासाठी 5 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला होता.सदर रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून रखडले होते.परंतु नगराध्यक्षानी रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा करून पुन्हा रस्त्याचे काम लवकरात लवकर चालू करून पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.चालू झालेल्या रस्त्याच्या कामाची काल नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव,उपनगराध्यक्ष श्रीधरजी पुजारी,गटनेते देवीदासभाऊ कडू यांनी पाहणी केली.
----------------------------------------
आपल्या भागातील बातम्यासाठी संपर्क करा..
वसुंधरा न्युज मावळ
मो.नं.८४८२९६९६४४
----------------------------------------
0 टिप्पण्या