मावळ : कोरोणा विषाणू या महामारी मुळे मावळ तालुक्यात
भारतीय जनता पार्टी च्या वतीने अत्यंत गरजू कुटुंबांना मा. राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे ,प्रभारी भास्कर म्हाळस्कर ,तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे,जि.प.नितिन मराठे, नितिन घोटकुले,तालुका महिला अध्यक्ष सायलीताई बोत्रे संघटणमंत्री किरण राक्षे, सुनिल चव्हाण अशा पदाधिकारी यांच्या प्रयत्नातुन मावळ तालुक्यात
गेली दोन महिने न थांबता अखंड
जीवनाअवश्यक वस्तूंचे किट,वैद्यकीय साहीत्य ,मास्क आदी वस्तूंचे वाटपाचे कार्य आज पर्यत सदैव चालु आहे.
आज
सोमवडी,जांबवली,शिर्दे परिसरातील कातकरी, आदिवासी,ठाकर पाड्यावर जाऊन नागरीकांना
भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे यांच्या माध्यमातून जीवनाअवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.वाटप करता वेळी सुरक्षेचे नियम पाळण्यात आले.या प्रसंगी जेष्ठ नेते गणपतमामा सावंत,पं.स.उपसभापती दत्ता शेवाळे,उपसरपंच गणपत शिंदे,युवा नेते उमेश पवार,सचिन पवार ,समीर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
मावळ तालुक्यातुन जोपर्यंत कोरोना विषाणू हद्दपार होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी चा कार्यकर्ता हा अखंडपणे सेवाकार्य चालु ठेवणार
- रविंद्र भेगडे , अध्यक्ष मावळ तालुका भाजपा
-----------------------------------------------
आपल्या भागातील बातम्यासाठी संपर्क करा..
वसुंधरा न्युज मावळ
मो.नं.८४८२९६९६४४
----------------------
---------------------------------------
0 टिप्पण्या