मावळ : कोरोना लॉकडाऊनमुळे नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून कामशेत शहरातील युवकांनी एकत्र येऊन आपत्कालीन सेवा ग्रुप तयार केला असून गेल्या ४२ दिवसापासून ते विविध प्रकारचे सेवा कार्य करत आहेत.
आपत्कालीन सेवा ग्रुपने सुरुवातीला लॉकडाऊन १ आणि २ मध्ये स्वखर्चाने गरजूंना अन्नधान्य किटचे मोठ्या प्रमाणात वाटप केले.त्याच बरोबर लॉकडाऊन 3 मध्ये राज्यातील तसेच बाहेरील राज्यातील कामशेत शहरात अडकून राहिलेल्या मजूर,व्यापारी, नागरीक यांना त्याच्या मूळ गावी,राज्यात जाण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले.या प्रत्यनातूनचं त्यानी राजस्थानला ८ बसेस,यवतमाळला १ बस,नांदेडला 3 बसेस,लातूरला ३ बसेस तसेच इतर ठिकाणी बसेस पाठवू ४८३ नागरिकांची गावी जाण्याची सोय केली.तसेच परप्रांतीय नागरिकांना गावी जाताना पाणी आणि अल्पोपहार यांची सोय करून देण्यात आली.
मावळ तालुक्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे हे शासनाच्या एस.टी महामंडळाच्या मार्फत आपल्या राज्यातील भागात तसेच इतर राज्यातील सीमेपर्यत नागरिकांना जाण्यासाठी बसेस उपलब्ध करून देत आहे;तरी ज्या नागरिकांना त्याच्या मूळ गावी जायचं आहे त्यानी छत्रपती शिवाजी महाराज चौक, महावीर राईस मिल,कामशेत येथे संपर्क करावा.
- आपत्तकालीन सेवा ग्रुप
0 टिप्पण्या