मावळ - तळेगाव स्टेशन भागात करोणाची लागण झाल्या मुळे मावळात सद्या भितीचे वातावरण झाले आहे.या घटने मुळे आँरेंज झोनमधे असणारा तालुक्यात पहिला रुग्ण सापडलेने प्रशासकीय यंत्रनेची झोप उडाली आहे.
परिचारिका हि खाजगी दवाखान्यात सेवेत असलेने त्यांच्या आरोग्य तपासणी झाली त्या वेळेस महिला पाँझिटिव्ह आढळली.या मुळे दक्षता म्हणुन तळेगाव शहर आणि तीन किलो मिटर परिसरातील गावे कंटन्मेंट झोन म्हणुन घोषीत करण्यात आला आला आहे.अशी माहीती मावळ तहसिलदार मधुसुदन बर्गे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
काल लोणावळ ,कामशेत मधे ही नागरिकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती.सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता काही नागरिक विनाकारण घराबाहेर निघुन गर्दी करत आहे .या मुळे प्रशासकीय यंत्रनेवर तान आला आहे
नागरिकांनी कामा शिवाय बाहेर जाऊ नये घरी राहून सुरक्षित राहने हेच खरे करोणा वरील औषध आहे. - रविंद्र भेगडे , भाजपा तालुका अध्यक्ष
---------------------------------
आपल्या भागातील बातम्यासाठी संपर्क करा..
वसुंधरा न्युज मावळ
समीर भोसले,पत्रकार मो.नं.८४८२९६९६४४
------------------------
0 टिप्पण्या